#BHAKTIGAANE #LatestBhajan #BestBhajan #Ganeshbhajan
या रे या Ya Re Ya Hindi Lyrics
या रे या सारे या गजाननाला आळवूया या.. (२)
नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया .. (२)
गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणीतुझ्या हे जीवन वाहू दे रे
नाथांचा नाथ तू मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू माउली तुझी दया
या रे या सारे या गजाननाला आळवूया या.. (२)
नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.. (२)
उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू कारण तू कर्ता
तू माता तूच पिता
तू बंधू तूच सखा
आम्हावरी राहू दे माउली तुझी दया
या रे या सारे या गजाननाला आळवूया या.. (२)
नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.. (२)
या रे या सारे या गणपती बाप्पा मोरया गजाननाला आळवूया या मंगलमूर्ती मोरया
नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया